तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूरचे युवा नेते आनंद कंदले यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आवाहन केले होते कि माझा वाढदिवसला केक, हार, फटाके, बॅनर ना लावता मला त्या बदल्यात गरजू विद्यार्थ्यांना देणे साठी शालेय साहित्य द्यावे, आणि त्यांच्या या आवाहनला प्रतिसाद देत त्यांच्या नेते,मित्र, सहकारी आणि त्यांच्या वर प्रेम करणाऱ्यांनी या उपक्रमला प्रचंड प्रतिसाद दिला, त्यांना शुभेच्छा म्हणून शालेयसाहित्य रुपी सहा ते सात हजार वह्या, तितेच पेन, पेन्सिल,कंपास व स्कुल बॅग मिळाल्या, त्यांनी त्या तुळजापूर शहरातील जिल्हा परिषद शाळा, नगर परिषद 2,नगर परिषद 3,नवीन मराठी शाळा, जिल्हा परिषद कन्या शाळा, तुळजामाता आश्रम शाळा, कुलस्वामिनी विदयालय,रामवरदायीनी शाळा, तुळजाभवानी प्राथमिक शाळा या विविध 9 शाळा मध्ये साधारण 5 ते 6 हजार वह्या व शालेय साहित्य वाटप करण्यात आले, गरजू विद्यार्थी साठी भेट स्वरूप शालेय साहित्य दिले बद्दल सर्वांचे आनंद कंदले यांनी आभार मानले.