परंडा (प्रतिनिधी) - परंडा तालुक्यात सध्या शेती पंपास वीजपुरवठाची परिस्थिती वारंवार बिकट होत चालली आहे रात्री अपरात्री उशिरा पर्यंत वीज पुरवठा खंडीत होत असतो विज समस्या दूर करण्यासाठी शेतात दिवसा लाईट राहणार याच धर्तीवर शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर ऊर्जा देण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र राज्य ऊर्जा विभाग अंतर्गत सरकार ने सर्वसाधारण इमाव शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मंजुर झाल्यावर 10 टक्के रक्कम भरायची आहे तर 90 टक्के अनुदानावर तर अनुसूचित जाती जमाती यांना (एससी/एसटी) या शेतकऱ्यांना सौर पंप मंजुर झाल्यावर फक्त 5 टक्के रक्कम भरायची आहे तर 95 टक्के अनुदानावर थेट लाभ देण्यासाठी सरकारने सकारात्मकता दाखवली आहे.अडीच एकर शेती करीता 3 अश्वशक्ती पंप तर पाच एकर शेती पर्यंत 5 अश्वशक्ती पंप आणि साडेपाच एकर वरील शेती करीता 7.5 अश्वशक्ती कृषी पंप योजना मध्ये शेतकऱ्यांना सौर पंप मिळणार आहेत तर शेतकरी लाभार्थी यांच्या कडे विहीर, बोअर, शेततळे किंवा जवळ नदीला बारमाही पाणी असावं यासाठी अर्ज करून घ्यावा.तसेच मागील वर्षी अटल सौर कृषी पंप योजना 1 ) अटल सौर कृषी पंप योजना 2 ) मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेल्या लाभार्थी यांना मागेल त्याला सौर कृषी पंप योजना मध्ये मोठ्या संख्येने सहभागी घेऊ शकतात तसेच या योजना करीता शेतकरी लाभार्थी यांना आधार कार्ड, सातबारा, बँक पासबुक, फोटो आणि सामुहिक क्षेत्रातील शेतकरी लाभार्थी यांना आधार कार्ड, सातबारा, बँक पासबुक, फोटो व 100 चा स्टॅम्प वर सहमती घेऊन अर्ज घरबसल्या ही आपल्या मोबाईल वरुन भरु शकतात किंवा महाई सेवा केंद्र, सीएससी केंद्र यांच्या मदतीने देखील अर्ज करू शकतात.