धाराशिव (प्रतिनिधी)- केंद्र सरकार प्रस्तावित नवीन साखर नियंत्रण कायद्यात बदल करण्यासाठी अथवा साखर उद्योगासमोरील अडचणी व गूळ पावडर उद्योगास हानिकारक असणाऱ्या अटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील ‌‘इजमा' या गुळ पावडर संघटनेच्या शिष्टमंडळाने संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष ॲड. व्यंकटराव गुंड यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री  प्रल्हाद जोशी तसेच केंद्रीय सहकार राज्यमंत्री  मुरलीधर मोहोळ यांची दिल्ली येथे भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्याची निवेदन सादर केले.

गुळ पावडर व खांडसरी साखर उद्योगामुळे हजारो शेतकऱ्यांचा साखर कारखान्याने न गाळप केलेला ऊस गाळप केला जातो. तसेच ग्रामीण भागातील युवकांना यामुळे रोजगार मिळत आहे. तसेच शेतकऱ्यांना देखील या उद्योगाचा फायदा होत आहे. या कायद्यामुळे खांडडसरी व गुळ पावडर उद्योग संकटात येणार असून याचे दुष्परिणाम सरकारपर्यंत पोहोचावेच्या उद्देशाने शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. यावेळी संघटनेचे माजी आमदार संजय बाबा घाडगे, संघटनेचे उपाध्यक्ष श्रीधर्यशील दादा कदम कारखान्याचे चेअरमन विजय नाडे, सतीश, ओंकार खुरपे, संजय खरात, अशोक आस्की व तज्ञ संचालक प्रवीण प्रजापती उपस्थित होते.

 
Top