तुळजापूर (प्रतिनिधी) - मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असताना देखील शासन मराठा आरक्षण मागणीची दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाने मंगळवार दि. 24 सप्टेंबर रोजी शासन व शासनातील मंत्र्यांच्या निषेधार्थ बोंब मारीत मोर्चा काढत शासनाचा निषेध केला.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासुन या बोंब मारो आंदोलनास आरंभ झाला. या आंदोलनात शासन तसेच मुख्यमंत्री, उपमुखमंञी यांच्या निषेधाचा घोषणा देत बोँब मारीत तहसिल कार्यालया जवळ शासनाचा जाहीर निषेध केला. या आंदोलनात सकल मराठा समाज शहर व तालुक्यातील सहभागी झाला होता.