उमरगा (प्रतिनिधी)- युवक शारीरिकदृष्ट्या निरोगी असेल तर मानसिक आरोग्यही चांगले राहते. युवक मानसिक दृष्ट्या निरोगी असेल तर शारीरिक दृष्ट्याही सक्रिय राहण्यास मदत होते. शाररिक आणि मानसिक आरोग्य हे एकमेंकावर अवलंबून असल्याचे मत रोटरी क्लबचे माजी प्रातंपाल डॉ. दिपक पोफळे यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील कोरेगांववाडी कॉलेज ऑफ फार्मसी व शिवाई इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग येथे गणेशोत्सवा निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. युवकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य याविषयावर डॉ पोफळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष सतीश साळुंके होते. यावेळी रोटरीचे सचिव जुगलकिशोर खंडेलवाल, संस्थेचे अध्यक्ष बी एच बेडदुर्गे, सचिव डॉ. विजय बेडदुर्ग यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ पोफळे यांनी सध्याच्या युवकांतील वाढती व्यसनाधिनता घातक आहे. उत्तम मानसिक स्वास्थ्यासाठी दैनंदिन जीवनात योग्य आहार घ्यावा. चांगल्या सवयीं अंगिकारत योग व प्राणायामाचा सल्ला देत दुसऱ्या आनंदात आपला आनंद शोधणे हेच सदृढ मनाचे लक्षण असल्याचे शेवटी सांगितले. यावेळी प्राचार्य महेश कदारे, प्रा अजय बेडदुर्गे, प्रा परिक्षीत शिरूरे, प्रा अश्विनी सुर्यवंशी, प्रा श्रीकृष्ण मुळे, प्रा फुलचंद काजळे, प्रा अंकिता यादव, प्रा अशोक गायकवाड, प्रा ओमकार पाटील, प्रा प्रिया धोंडगे, प्रा धनश्री भुजंगे, प्रा शुभम सुर्यवंशी, प्रा अभिजित पाटील, प्रा दिव्या बिराजदार आदीसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा अंकिता वडजे यांनी केले. प्रा संतोषकुमार जखोटीया यांनी आभार मानले.

 
Top