उमरगा (प्रतिनिधी)-शहरातील भारत शिक्षण संस्था संचलित श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील संगणक विभागाच्या वतीने शनिवारी, (दि 14) बीसीएस व बीएससी आयटी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे होते. यावेळी पुणे येथील मायक्रोसॉफ्ट कंपनीचे डेप्युटी मॅनेजर विठ्ठल भोसले, संगणक विभागाचे विभाग प्रमुख डॉ एस एस रेवते, प्रा रेशमा नितनवरे, प्रा अजय कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना विठ्ठल भोसले यांनी संगणक क्षेत्रात करिअरच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध असल्याचे सांगून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, नेटवर्किंग, क्लाउड कंप्युटिंग आणि अनेक इतर शाखा समाविष्ट आहेत. प्रत्येक शाखेत नवीन नवीन तंत्रज्ञान आणि उपकरणांचा विकास होत आहे. ज्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. भारत हा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि आयटी सेवांचे एक प्रमुख केंद्र बनला आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात आपले केंद्र स्थापित करत आहेत. यामुळे भारतातील इंजिनिअर्स आणि प्रोग्रामर्सना जगभरातील कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळत आहे. आपल्याकडे जर योग्य कौशल्य आणि कल्पनाशक्ती असेल तर या क्षेत्रात यशस्वी होता येते असे शेवटी सांगितले. यावेळी कांचन ब्याळे, पूजा वडदरे यां विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ एस एस रेवते यांनी केले. सुत्रसंचालन नम्रता कोकळे व प्रा श्रद्धा पाटील यांनी केले. प्रा लक्ष्मी पाचंगे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला संगणक विभागातील कर्मचारी  व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top