तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील ग्रामपंचायत सारोळा मध्ये झालेल्या गैरव्यवहार बाबत.कुठली ही कार्यवाही होत नसल्याने या प्रकरणाची दखल न घेतल्यास सोमवार दि 30 रोजी सकाळी 11वा ग्रामपंचायत समोर आत्मदहन करण्याचा इषारा वजानिवेदन जिल्हाअधिकारी यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे कि, आपल्या कार्यालयाकडे दिनांक- 21/08/2024 रोजी दिलेला त्रिशाला विनोद पाटील, प्रविण विठ्ठल नागदे,निकीता सुशील धनके, अंबिका उषाकांत मंडोळे, सर्व ग्रा.प. सदस्य सारोळा ता. तुळजापूर जि. धाराशिव पो सांगवी मार्डी पिन कोड-413623 कार्यालयाकडे संदर्भीय
पत्रानुसार वरील संदर्भीय विषयान्वये विनंती पूर्वक अर्ज केला होता. आपल्या कार्यालयाने मा. गट विकास अधिकारी तुळजापूर व तहसिलदार तुळजापूर यांना वरिल संदर्भ पञ काढले होते. तरी सदरील आपल्या पत्रानुसार काहीही कार्यवाही केलेली नसुन तरी याची तात्काळ दखल घ्या अन्यथा सारोळा ग्रामपंचायत समोर सोमवार दि30रोजी ग्रामपंचायत कार्यालया समोर आत्मदहन करु. आमच्या आत्मदहनाचे आपली जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी.
असा इशारा त्रिशाला विनोद पाटील, प्रविण विठ्ठले नागदे, निकीता सुशील धनके, अंबिका उषाकांत मंडोळे यांनी दिला.