भूम (प्रतिनिधी)-कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर व कृषिवाणी फार्मर प्रोडूसर कंपनी लि. गिरवली यांचे संयुक्त विद्यमाने शेतकरी कार्यशाळा गिरवली येथे आज रोजी सकाळी 9.30 वाजता आयोजित केली होती. KVK चे डॉ. अरबाड बी. के., शास्त्रज्ञ, सेंद्रिय शेती व रब्बी पिक नियोजन या विषयावर शेतकर्यांना माहिती दिली तसेच डॉ. विजयकुमार जाधव, शास्त्रज्ञ KVK, यांनी उच्च प्रतीचा खावा निर्मिती व दुग्ध व्यवसाय याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तालुका कृषी विभाग,भूम येथील एम एस वाणी, कृषी मंडळ अधिकारी, ईट विभाग, यांनी फळबाग लागवड व शासकीय योजना संबंधी प्रस्ताव कसे दाखल करायचे याबाबत सविस्तर माहिती दिली. शिंदे, आत्मा, भूम तालुका कृषी विभाग, यांनी अन्नप्रक्रिया उद्योग व त्यावर शासकीय लाभ कसा मिळवायचा याबाबत सविस्तर माहिती दिली. शासकीय योजनांचा शेतकऱ्यांना व नागरीकांना खूप फायदा होईल असे कार्यक्रमास उपस्थितांना वाटले.