धाराशिव (प्रतिनिधी)- प्रियदर्शनी इंदिरा गांधी महिला सहकारी पतसंस्था मर्या. धाराशिवची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी संस्थेच्या अध्यक्ष डॉ. स्मिता शहापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

शहरातील संत गोरोबा काका वाचनालयात शनिवार, 28 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा साहित्य परिषदेच्या धाराशिव शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे, यशस्वी उद्योजिका प्रियंका अजमेरा, सहकार अधिकारी मधुकर जाधव, धनंजय कुलकर्णी, नागणे, माधव इंगळे, ॲड. ज्योती वाघे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना संस्थेच्या अध्यक्षा डॉ. स्मिता शहापूरकर यांनी संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले. या संस्थेची आर्थिक स्थिती प्रगतीपथावर असून मुल्याकनानंतर संस्थेचे ड श्रेणीमधून क मध्ये श्रेणीवर्धन झाले आहे. संस्थेचे 768 सभासद असून भागभांडवल 11 लाख 50 हजार 35 इतके आहे. बचत ठेव खाते 1 लाख 56 हजार 898 तर आवर्त ठेव 63 लाख 35 हजार 634 तर मुदतठेव एक लाख 95 हजार 500 असल्याचे सांगितले. तसेच संस्थेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. संस्थेच्या सन 2023-24 च्या आर्थिक पत्रकास मंजुरी देण्यात आली. संस्थेच्या नूतन संचालक उषा वाडे, रोहिनी नायगावकर, सुरेखा जगदाळे, नूतन सचिव डॉ. ज्योती कानडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. स्मिता शहापूरकर, नितीन तावडे, प्रियंका अजमेरा, सहकार अधिकारी मधुकर जाधव यांनी उपस्थित पदाधिकारी व सभासदांना मार्गदर्शन केले. यावेळी पतसंस्थेच्या ठेवीदार, खातेदार, गुंतवणूकदार, कर्जदार यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. ज्योती कानडे यांनी उपस्थितांना नेत्र आजाराविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल जगदाळे, प्रास्ताविक उषा वाडे तर आभार तज्ञ संचालक धनंजय कुलकर्णी यांनी मानले.  यावेळी संस्थेचे पदाधिकारी, सभासद, नागरिक उपस्थित होते.

 
Top