धाराशिव  (प्रतिनिधी)- जिल्हयातील प्राधानमंत्री ग्रामसडक योजना भाग 3 अंतर्गत सन 2024-25 वर्षाकरीता खालील रस्त्याकरीता 42 कोटी 49 लक्ष रुपये एवढा निधी मंजुर करण्यात आली असल्याची माहिती खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिली. तसेच रस्त्याची कामे तात्काळ मार्गी लावण्याबाबत प्रशासनाला सुचना देण्यात आल्या आहेत.

एम.डी.आर.9 ते वांगी देवंग्रा ता भुम 10 कोटी 92 लक्ष रुपये, लोहारा (बु) ते कानेगाव 6 कोटी रुपये, आलुर ते वरनाळवाडी  ते राज्य सरहद्द 8 कोटी 24 लक्ष, एन.एच. 65 जेकेकुरवाडी ते महाराणा प्रताप तांडा 6 कोटी 39 लक्ष, एम.डी.आर. 09 ते लोणी  कपिलापुरी 10 कोटी 94 लक्ष एकुण 42 कोटी 49 लक्ष रुपये एवढी भरीव तरतुद ग्रामीण भागातील वरील रस्त्यांकरीता करण्यात आली आहे. सदर निधीतुन वरील रस्ते दुरुस्त होणार असल्याने या मार्गावरील वाहतुक सुसाहय ठरणार आहे.  

 
Top