धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्य़ातील वाणेगावची कन्या मुस्कान पठाणचा धाराशिवच्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात पहिल्याच फेरीत प्रवेश मिळाल्याबद्दल श्री साई श्रध्दा एज्युकेशनचे संचालक प्रा. सोमनाथ लांडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

मुस्कान पठाण ही मुलगी अतिशय सामान्य कुटुंबातील असून, तिने यशवंतराव चव्हाण कॉलेज सातारा येथे बारावी विज्ञान 75% गुण घेऊन चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाली. तिने नीट परीक्षेची तयारी स्वतःची चांगल्या पद्धतीने अभ्यास करून व वारंवार परीक्षा अर्थात टेस्ट देऊन केली. तिला नीट परिक्षेत 576 गुण मिळाले आहेत. तिचे 10 वी पर्यंतचे शिक्षण संजिवनी माध्यमिक विद्यालय काक्रंबा येथे झाले असून तिला 10 वीला 94% गुण मिळाले होते. शालेय शिक्षण पूर्ण करत असताना तिने खूप जिद्दीने अभ्यास करून हे यश मिळवून परिसरात नावलौकीक मिळवला आहे. मुस्कान पठाणची तयारी, नीट प्रवेश प्रक्रिया श्री साई श्रध्दा एज्युकेशन नीट ऑनलाईन टेस्ट सीरिजचे प्रा. सोमनाथ लांडगे यांच्या मार्गदर्शनातून ॲडमिशन काउन्सलिंग प्रक्रिया पार करण्यात आली. आता पर्यंत अनेक शहरी व ग्रामीण भागातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रा. सोमनाथ लांडगे यांच्या मार्गदर्शनातून एमबीबीएस, बीडीएस व बीएएमएसला श्री साई श्रध्दा एज्युकेशन नीट ऑनलाईन टेस्ट सीरिज मार्फत प्रवेश मिळवून दिला आहे.

मुस्कान पठाणच्या या यशाबद्दल तिचे श्री साई श्रध्दा एज्युकेशनने सत्कार करून पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी तिची आई शावर सादिक पठाण, काका जावेद पठाण, मुहिद्दिन पठाण व श्री साई श्रध्दा मुलींच्या वस्तीगृहाच्या संचालिका उषाताई लांडगे उपस्थित होत्या. मुस्कान पठाणच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 
Top