तेर( प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत लाठीकाठी चालविण्याचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. शालेय शिक्षणा बरोबरच विद्यार्थीनीची सुरक्षितता महत्त्वाची आहे.मुलींना स्वसंरक्षण करता येणे गरजेचे आहे . यादृष्टीने धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा तेर येथे मुलींना तेर ग्रामपंचायतचे सदस्य .नवनाथ पसारे यांच्या मार्गदर्शनाखाली लाठीकाठी चालविण्याचे प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे.मुलींना लाठीकाठी चालविण्याचे प्रशिक्षण ही संकल्पना मुख्याध्यापिका सुरेखा कदम यांची आहे.