तेर (प्रतिनिधी) - तेरणा धरणातून शुद्ध पाणिपुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे ग्रामपंचायतकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की की,2012 पासून अनेकवेळा तेरणा धरण भरूनसुद्धा तेर ग्रामपंचायने लोकांसाठी एकदाही शुद्ध पाणिपुरवठा केला नाही.ग्रामपंचायतने केवळ नदिमधील अशुद्ध पाणीपुरवठा करून लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे.ग्रामपंचायतच्या माध्यमातून आजही नळपट्टी म्हणून पाण्यासाठी पैसे घेतले जात आहेत.मात्र त्याच पट्टीत शुद्ध आणि मूबलक प्रमाणात तेरणा धरणातून पाणीपुरवठा केला जात नाही.तरी सरपंच व ग्रामसेवक यांना विनंती करण्यात येत आहे की, आपण आठ दिवसांत शुद्ध पाणिपुरवठा नाही केला तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरीकानी तेर ग्रामपंचायतला निवेदनाद्वारे दिला आहे.निवेदनावर तानाजी पिंपळे, सचिन देवकते, केशव सलगर, रमाकांत लकडे, शिवाजी पडूळकर, राजपाल थोडसरे,किरण नाईकवाडी, सोमनाथ धायगुडे,पवन माने, नागनाथ टेळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.