धाराशिव (प्रतिनिधी) - हिंदू हृदय सम्राट तथा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून धाराशिव जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी शिवसेना शाखा उद्घाटनाचा सपाटा लावला असून त्यांच्या पुढाकारातून व संकल्पनेतून जुनोनी येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गावातील ज्येष्ठ मंडळी, पक्ष पदाधिकारी व गावातील मंडळी उपस्थित होते .यावेळी गावातील नागरिकांनी मूलभूत अडचणी अण्णांना सांगितल्या व त्या सोडण्याचे आश्वासन ग्रामस्थांना त्यांनी दिले .यावेळी गावातील नागनाथ पाटील, अकबर शेख राजा मामू शेख, अण्णा पाटील व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच वलगुड येथेही शिवसेना शाखेचे उद्घाटन अण्णांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी गावकऱ्यांनी रस्त्याची अडचण अण्णा जवळ व्यक्त केली .ही अडचण शासन दरबारी प्रगतीपथावर आहे . त्यासाठी नक्की पाठपुरावा करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले . याप्रसंगी गावातील बिभिषण जाधव , भारत जाधव भोंग , शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच सुर्डी या ठिकाणी शिवसेना शाखेचे उद्घाटन त्यांनी केली. यावेळी गावातील गावकऱ्यांनी धोंडेबुवा महाराज मंदिराच्या सभा मंडपाचे बऱ्याच दिवसापासून रखडलेले काम शासन दरबारी मार्गी लावण्याची मागणी केली हे काम शासन दरबारी लवकरात लवकर मंजूर करून पूर्ण करण्याच्या आश्वासन त्यांनी दिले. यावेळी गावातील मनोज अण्णा चोपाटे, रमेश शेलार, माळी पांडागळे ,कांबळे,लोभे,माने, जोगाडे व गावातील असंख्य नागरिक व शिवसैनिक उपस्थित होते. तसेच बेगडा या ठिकाणीही अण्णांचा हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी गावाकडे गावकऱ्यांनी बऱ्याच दिवसापासून रखडलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सभामंडपाचे काम व गावातील दोन मंदिर बांधून द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी अण्णांकडे केले . हे काम शासन दरबारी पाठपुरावा करून लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आश्वासन त्यांनी गावकऱ्यांना दिले. याप्रसंगी पोपट साळुंखे , दीपकराव देशमुख ,नाना शेंदारकर ,रमेश साळुंखे, कसबे, क्षीरसागर व गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.