धाराशिव (प्रतिनिधी)- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत धाराशिव शहरातील रमाई नगर येथे सिमेंट रस्ता कामाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून रमाई नगर येथील सिमेंट रस्ता कामासाठी विकास निधी मंजूर करून या कामाची प्रत्यक्ष सुरुवात आज उद्घाटनाने झाल्यानंतर रमाई नगर परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. या उद्घाटन प्रसंगी बोलताना श्री. नितीन काळे म्हणाले की राज्यातील व केंद्रातील सरकार हे सर्वसामान्य सरकार असून समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहोचवल्याशिवाय हे सरकार शांत बसणार नाही. आगामी काळात शहराच्या व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आ. राणा जगजितसिंह पाटील व मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी सदैव तत्पर असून शहर व जिल्ह्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सदर कामाचा दर्जा व गुणवत्ता राखून काम करावे असेही त्यांनी याप्रसंगी संबंधितास सांगितले. याप्रसंगी आनंद भालेराव, मेसा जानराव, नरेन वाघमारे, संपत जानराव, सिद्धार्थ बनसोडे, सचिन लोंढे, संदीप जेठीथोर, नितीन जानराव, शुभम शिंगाडे, सुशील शिंदे, गौतम सोनवणे, अक्षय जानराव आदीसह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.