परंडा (प्रतिनिधी) - श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा विद्यार्थी शेख तौफिक अमीर याची नुकतीच ठाणे शहर पोलीस पदी नियुक्ती झाल्याने त्याचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपप्राचार्य डॉ.महेशकुमार माने स्टाफ सेक्रेटरी प्रा.डॉ. शहाजी चंदनशिवे व कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख उपस्थित होते. तौफिक अमीर याने पोलीस पदासाठी परीक्षा दिली होती त्याचा निकाल 18 ऑगस्ट रोजी लागला व त्यास आत्ता ठाणे शहर पोलीस पदी नियुक्ती देण्यात आली आहे.तौफिक याचे महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापक यांनी त्याचे अभिनंदन करत त्याचे कौतुक ही केले. पुढील कार्यकास शुभेच्छा दिल्या क्रर्यकर्माचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.चंदनशिवे यांनी केले होते.