धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव तालुका शालेय मैदानी  क्रीडा स्पर्धेचे 5 व 6 सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये रुपामाताच्या अनेक विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन केले. विविध स्पर्धा प्रकारामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

ओंकार व्यंकट माळी-19 वर्ष वयोगट थाळीफेक स्पर्धेत-तालुक्यातून प्रथम, भरत गोविंद माळी- 19 वर्ष  वयोगटात- गोळा फेक या स्पर्धेत  तालुक्यात- प्रथम, श्रीकृष्ण अंकुश टिपे-19 वर्ष वयोगटात-400मी धावणे, तालुक्यात प्रथम, भरत गोविंद माळी_ 19 वर्ष वयोगटात  , भालाफेक स्पर्धेत तालुक्यात प्रथम, ओंकार व्यंकट माळी_19 वर्ष वयोगटात, उंच उडी स्पर्धेत तालुक्यात प्रथम, श्रीकृष्ण अंकुश टिपे -19 वर्ष वयोगटात, गोळा फेक स्पर्धेत द्वितीय, अफ्रीन हाजू सय्यद__19 वर्ष वयोगट गोळा फेक स्पर्धेत तालुक्यात द्वितीय, सगुना अंकुश टिपे -14 वर्ष वयोगटात धावणे स्पर्धेत तालुक्यात द्वितीय, सगुना अंकुश टीपे -14 वर्षे वयोगटात _गोळा फेक स्पर्धेत तृतीय. हे सर्व विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र झालेले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. व्यंकटराव विश्वनाथ गुंड, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी, समुद्रवाणी बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी,आदटराव, केंद्रप्रमुख गिरी,समुद्रवाणी केंद्राचे केंद्रप्रमुख मोरे, तालुका क्रीडा संयोजक, बिभीषण पाटील, रुपामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य  सुरेश मनसूळे सर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सूर्यवंशी सर, क्रीडा शिक्षक शेख बी. एम, जावळे बी एस, गोरे. एन .के,  यादव एस बी, गावित एन.जे., सोनकठले .एस ए., श्रीमती गुंड एम एस.,पवार. आर बी, थोरात दयानंद, दिलीप ठाकूर, तसेच पालक, यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे  अभिनंदन व कौतुक केले.

 
Top