भूम (प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्यामध्ये जातीय सलोखा बिघडवण्याचे हेतूने वक्तव्य करणारे रामगिरी महाराज तसेच जातीय तेढ निर्माण होऊन दंगल घडावी या हेतूने बेताल वक्तव्य करणारे भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करून त्यांना अटक करावी राज्यपाल महोदय साहेब, कार्यालय यासाठीचे राज्यपाल भवन मुंबई,महाराष्ट्र राज्य यांना समस्त मुस्लिम बांधव भूम शहर आणि भूम तालुका वतीने उपविभागीय अधिकारी भूम मार्फत निवेदन देण्यात आले
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या पंधरा-वीस दिवसापूर्वी रामगिरी महाराजांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावलेल्या होत्या. सदरील रामगिरी महाराजांच्या बेताल वक्तव्या विरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणामध्ये निदर्शने तसेच त्यांना अटक व्हावी म्हणून वेगवेगळ्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांच्याविरुद्ध तक्रारी सुद्धा दाखल केलेले आहेत. तसेच महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पोलिस स्टेशन अंतर्गत रामगिरी महाराजांचे विरोधात एफ आय आर सुद्धा दाखल झालेल्या आहेत. त्याप्रमाणे नितेश राणे यांच्या बेताल वक्त्व्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत. त्या दोघांना अटक करण्यासाठी संबंधित गृह खात्याला आदेशित करण्यात यावे अशी विनंती केली आहे.