धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाड्याच्या सकस मातीने देशाला अनेक महापुरुष दिले असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विद्या समितीचे अध्यक्ष तथा कोल्हापूर विभागाचे विभाग प्रमुख श्रीराम साळुंखे यांनी केले. येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम साळुंखे बोलत होते.
मराठवाड्याच्या मातीमध्ये गुणवत्ता आहे. या मातीने देशाला अनेक महापुरुष दिलेले आहेत. राजकीय क्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्रात देखील मराठवाडा अव्वल आहे. महाराष्ट्राचे अनेक मुख्यमंत्री देखील मराठवाड्यातील होऊन गेले. त्यामुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासात मराठवाड्याचे खुपच योगदान आहे. असे ते यावेळी म्हणाले.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सावता फुलसागर यांनी देखील मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याच्या इतिहासावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य बबन सूर्यवंशी, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे सह समन्वयक डॉ.संदीप देशमुख डॉ.केशव क्षिरसागर आदींसह महाविद्यालयातील सर्व कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.