परंडा (प्रतिनिधी) - येथील जिल्हा परिषद प्रशाला व जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी बलिदान दिलेल्या महात्मा यांच्या विषयी भाषणे केले पोर्णिमा सिरसकर, श्रावणी शिंदे, घनश्याम कडायत तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक रामचंद्र इंगळे, कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक दिनकर पवार व प्रमुख पाहुणे म्हणून अब्दुल गनी हन्नुरे यांनी भाषणातून मराठवाडा मुक्तिसंग्राम दिना विषयी माहिती सांगितली.
याप्रसंगी पोर्णिमा सिरसकर या विद्यार्थिनीने चारोळी व काव्याच्या माध्यमातून मराठवाडा मुक्तिसंग्राम दिना विषयी उत्कृष्ट माहिती सांगितली त्याबद्दल कन्या प्रशाला व जिल्हा परिषद प्रशाले तर्फे तिचा सत्कार करून पारितोषिक देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेव पखाले तर सूत्रसंचालन शशिकांत माने यांनी केले. आबासाहेब माळी यांनी आभार प्रदर्शन केले.या कार्यक्रमास कुमार बनसोडे, सतीश खरात,भाऊसाहेब सुर्यवंशी,तानाजी मिसाळ,नारायण शिंदे, चंद्रकांत सुरवसे गीता मंडलिक,रेखा उसराटे, शुभांगी देशमुख ,मीनाक्षी मुंडे, बाबूधी घाडगे, कुलसुम हुसेनी, साबिया तांबोळी, तसेच दोन्ही प्रशालेतील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.