धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अळणी तालुका धाराशिव येथील प्राथमिक शाळेची ग्रामशिक्षण समिती मुदत संपल्या मुळे दिनांक 31 ऑगस्ट रोजी शाळेच्या प्रांगानावर नव्याने गठीत करण्यात अली. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री बशीर तांबोळी यांनी समितीची रचना व कार्य याची माहिती सर्व पालकांना दिली. पालकांच्या समक्ष विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात गुप्त पद्धतीने लहान मुलाच्या हस्ते वर्गनिहाय आरक्षण टाकण्यात आले. प्रत्येक वर्गातून एका पालकांची सदस्य म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. यामद्ये श्रीमती रोहिणी चौगुले, महेश वीर, श्रीमती उषा यादव, श्री तानाजी सुरवसे, श्रीमती अनिता पौळ, श्रीमती संजीवनी पौळ, श्रीमती अफसांना शेख, व शिक्षण तज्ञ् म्हणून निलेश देशमुख यांची एकमताने निवड करण्यात अली व त्याच दिवशी एक तासाने नवनियुक्त सदस्य यांच्या मधून अध्यक्ष म्हणून श्रीमती संजीवनी पौळ व उपाध्यक्ष म्हणून श्रीमती अफसाना शेख यांची एकमताने निवड केली. या नंतर मावळत्या अध्यक्ष व सदस्यांचे मुख्याध्यापक यांचे हस्ते गुलाबपुष्प देऊन निरोप देऊन आभार व्यक्त करण्यात आले व नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्याचे स्वागत शाळेच्या वतीने करण्यात आले कार्यकामाचे सूत्रसंचालन श्रीमती सत्य शिला म्हेत्रे यांनी केले व आभार प्रदर्शन दिनेश पेठे यांनी आभार मानले, कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी हनुमंत माने, श्रीमती वर्षा डोंगरे, श्रीमती राधाबाई वीर, श्रीमती क्रांती मते,दादासाहेब कचरे यांनी परिश्रम घेतले.