धाराशिव (प्रतिनिधी)-युवक काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी धवलसिंह लावंड, शहराध्यक्षपदी स्वप्नील शिंगाडे, जिल्हा सचिव पदी सौरभ गायकवाड तसेच
खयुम सय्यद यांची शहर कार्याध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज पाटील, ज्येष्ठ नेते विश्वासराव शिंदे यांच्या शुभहस्ते युवक जिल्हाध्यक्ष अश्लेश मोरे यांनी सदर निवडी केल्या आहेत. या निवडीबद्दल धाराशिव येथे शहर काँग्रेस तर्फे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जिल्हा काँग्रेस मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, जनता बँकेचे संचालक आशिष भैय्या मोदानी, डीसीसी बँकेचे संचालक मेहबूबपाशा पटेल, जिल्हा काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष सय्यद खलील सर, उपाध्यक्ष प्रशांत काका पाटील, कोषाध्यक्ष बापू शेळके, बाजार समितीचे संचालक उमेश राजेनिंबाळकर, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, जिल्हा सचिव सुरेंद्र दादा पाटील, पत्रकार धनंजय पाटील, मानवाधिकार विभाग जिल्हाध्यक्ष अभिमान पेठे, विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कफिल सय्यद, अभिषेक नाना बागल, शहर सरचिटणीस संजय गजधने, शहर उपाध्यक्ष आरेफ मुलाणी, हाज्जू शेख, विक्की सोनटक्के यांनी शुभेच्छा दिल्या.