धाराशिव (प्रतिनिधी)- अखिल भारतीय काँग्रेस अंतर्गत एनएसयुआय (विद्यार्थी काँग्रेस) ची धाराशिव जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. नूतन पदाधिकाऱ्यांचा रविवारी जिल्हा काँग्रेस भवन येथे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष सय्यद खलील, मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

एनएसयुआय नूतन जिल्हा कार्यकारिणीध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी सादिक शेख, पांडुरंग गोंडवले, सिराज सिद्दीकी, सरचिटणीस स्वप्नील शेरखाने, गहिनीनाथ सोनटक्के, सचिव यासिन चाऊस, फैसल मुजावर, अजहर बादल सय्यद,  मकसुद शिकलकर तसेच कळंब तालुकाध्यक्षपदी अजित शेळके, भूम तालुकाध्यक्ष मुशर्रफ सय्यद, तुळजापूर तालुकाध्यक्ष किरण वाघोले, लोहारा तालुकाध्यक्ष अमित विरोधे, वाशी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील तर  उमरगा तालुकाध्यक्षपदी समीर शेख यांची नियुक्ती करण्यात आली. निवड जाहीर झाल्यानंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विलास शाळू, भूम तालुकाध्यक्ष रुपेश शेंडगे, युवक काँग्रेसचे उमेश राजे,  मागासवर्गीय विभागाचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, जिल्हा काँग्रेस सचिव अशोक बनसोडे, मानवाधिकार विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर लोंढे, स्वयंरोजगार विभागाचे जिल्हाध्यक्ष अहमद चाऊस, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष आरेफ मुलाणी, अरबाज शेख, शोएब शेख, अज्जू शेख व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top