धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या पावन तुळजापूर नगरीत सकल ओबीसी समाजाचा भव्य महाएल्गार मेळावा आयोजित करण्यात येत आहे. मेळाव्याच्या आयोजनाबाबत रविवारी (दि.8) तुळजापूर येथील विश्रामगृहात सचिन शेंडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत व विकी घुगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला सकल ओबीसी समाजाचा मोठा प्रतिसाद मिळाल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सचिन शेंडगे यांनी दिली.

सकल ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केलेले आहे. या पार्श्वभूमीवर महाएल्गार मेळाव्याला मोठे महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्या पार्श्वभूमीवर बैठकीत महाएल्गार मेळाव्याच्या आयोजनासंदर्भात कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सकल ओबीसी समाजचे श्याम माळी, गोविंद देवकर, आप्पासाहेब पाटील, श्रीमंत चौगुले, हरीभाऊ मंडोळे, चंद्रकांत पवार, चेतन बंडगर, व्यंकट झाडे, सुधाकर बंडगर, संजय मोटे, रमेश मोटे, शहाजी देवगुंडे, अंगद मदने, पांडुरंग सातपुते, कपिल देवकते, नेताजी देवकर, तुकाराम देवकर, रमाकांत लकडे, ऋषीकेश रोकडे, मारुती रोकडे, नागनाथ बोरगावकर, हरीदास वाघमारे, श्याम ढेरे, प्रमोद देवकर, प्रा.महाशंकर टिळे, मदन रेनगडे पाटील यांच्यासह सकल ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top