तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील तेरणा विद्यालयात  डॉ . सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली.                          

यावेळी तेरणा ट्रस्टचे  विश्वस्त बाळासाहेब वाघ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष गायकवाड हे होते.याप्रसंगी प्रशालेतील ज्येष्ठ सहशिक्षक नंदकुमार खोत यांचा प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी अच्युत हाजगुडे,सूर्यकांत जाधव, बिभीषण देटे, रमेश लकापते, प्रदीप कोकाटे, सुवर्णा घुटे, सुधाकर चव्हाण , नवनाथ जाधव, निळकंठ लाकाळ, राधाकृष्ण राऊत इत्यादी उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नवनाथ पांचाळ यांनी केले.

 
Top