धाराशिव (प्रतिनिधी)-आदिवासी पारधी महासंघ महाराष्ट्र प्रदेश व जिल्हा कार्यकारिणीची बैठक दि (22) रोजी धाराशिव शहरातील बाह्यवळण रस्ता येथील रायगड फंक्शन हॉल येथे दुपारी दोन वाजता होणार आहे या बैठकीसाठी आदिवासी पारधी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब साळुंखे महासचिव रा.ना. सोनावणे महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष प्रमुख राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित राहणार आहेत. तरी या बैठकीस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष सुनील रामा काळे यांनी केले आहे.

 
Top