धाराशिव (प्रतिनिधी)- गेल्या 70 वर्षापासून सत्तेत असलेल्या सरकारने एसटी आरक्षणापासून धनगर समाजाला वंचित ठेवले आहे. त्यामुळे समाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धनगर समाजाला एसटीचे आरक्षण तत्काळ द्या, अन्यथा 20 सप्टेंबर रोजी हातलाई येथील तलावात सकाळी 11 वाजता जल समाधी आंदोलन करण्यात येईल. असा इशारा सकल धनगर समाजाच्यावतीने देण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये धनगर समाजाला एसटीचे आरक्षण दिले आहे. परंतु सत्ताधाऱ्यांनी धनगर समाजाला त्यापासून वंचित ठेवले आहे. या विरोधात महाराष्ट्रात धाराशिव, पंढरपूर, लातूर, अहमदनगर, पुणे या शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलन झाली. परंतु सरकारवर यांचा कोणताही परिणाम झाला नाही. त्याच्या निषेधार्थ जलसमाधी आंदोलन करणार असल्याचे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात प्रा. सोमनाथ लांडगे यांनी सांगितले. या निवेदनावर राजाराम कुचेकर, राजू मैंदाड, नवनाथ मारकड, समाधान वाघमोडे, रामलिंग वाघमोडे, सुभाष मैंदाड, सुमित पालवे, लिंबराज डुकरे, बालाजी वगरे, समाधान पडुलकर, काकासाहेब सोनटक्के यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.