धाराशिव (प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांकडून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची हत्या करण्याच्या, त्यांची जीभ छाटण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. दिल्लीतील भाजपचा नेता तरविंदरसिंह मारवा याने “राहुल गांधींची अवस्था त्यांची आजी इंदिरा गांधी सारखी करू“ अशी खुलेआम धमकी दिली आहे. भाजप केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू यांनी राहुल गांधींना दहशतवादी म्हंटले आहे. शिंदेंच्या शिवसेनेचा गावगुंड आमदार संजय गायकवाड याने राहुलजींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. तर भाजपचा राज्यसभा खासदार अनिल बोंडे याने राहुल गांधी यांच्या जिभेला चटके दिले पाहिजे असे वक्तव्य केले आहे. या सर्वांच्या विरोधात धाराशिव जिल्हा काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज पाटील, विश्वास शिंदे, सय्यद खलील, प्रशांत पाटील, अभिजित चव्हाण, विनोद वीर, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, सुभाष राजोळे, विलास शाळू, उमेश राजे निंबाळकर, शिला उंबरे, ज्योती सपाटे, आयुब पठाण, सिद्धार्थ बनसोडे, धनंजय राऊत, अशोक बनसोडे, सुरेंद्र पाटील, अनंत घोगरे, प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार, प्रभाकर लोंढे, अनिलकुमार लबडे, तनुजा हेड्डा, सुवर्णा ढवळे, प्रेम सपकाळ, अभिषेक बागल, शहाजी मुंडे, सलमान शेख, प्रभाकर डोंबाळे, स्वप्नील शिंगाडे, सौरभ गायकवाड, भारत काटे, संकेत पडवळ, रोहित पडवळ, अश्रूबा माळी, संजय देशमुख, महादेव पेठे, भूषण देशमुख, संतोष पेठे, सुभाष हिंगमीरे, सचिन धाकतोडे, संजय गजधने यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.