तुळजापूर (प्रतिनिधी)- विघ्नहर्ता गणरायाचे आगमन शनिवार  दि. 7 सप्टेंबर रोजी पारंपारिक पध्दतीने मोठ्या उत्साहात आगमन झाले. शहरातील काही सार्वजनिक गणेश मंडळांनी मिरवणूक काढुन तर काही मंडळांनी साधेपणाने  श्रीगणेश मुर्तीची प्रतिष्ठापना केली.

श्रीतुळजाभवानी मंदीरात प्रशासकीय व्यवस्थापक तथा तहसिलदार माया माने यांच्या हस्ते धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले, संतोष भिंके, विश्वास परमेश्वर, आदमाने सह मंदीर अधिकारी, कर्मचारी, भाविक यांच्या उपस्थितीत श्रीगणेश मुर्ती प्रतिष्ठापना केली. राजा कंपनी गणेश मंडळाच्या श्रीगणेश मुर्तीची प्रतिष्ठापना माजी नगराध्यक्ष श्री व सौ सचिन रोचकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

गंगणे परिवाराच्या श्रीगणेशाची प्रतिष्ठापना स्ञी शक्ति हस्ते 



गंगणे परिवाराने आपल्या घरच्या श्रीगणेश मुर्तीची  प्रतिष्ठापना स्त्री शक्ती हस्ते विधीवत केली. यावेळी  अर्चनाताई विनोद गंगणे, प्रियंका विजय गंगणे, पूजा विनोद गंगणे, प्रिया विनोद गंगणे, विआन गंगणे, रूद्र गंगणे, विनोद गंगणे, विजय गंगणे, कियारा कदम आदी यावेळी उपस्थितीत होते.

 
Top