तुळजापूर (प्रतिनिधी)- 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिनापर्यंत हैदराबाद गॅझेटीयर लागू करून मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी नोंदी देण्यात याव्यात. शिवसेना प्रवक्ते योगेश केदार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी. केली असता या मागणीच्या निवेदनावर तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. हैदराबाद ला समिती पाठवून सर्टीफाईड कॉपी मागवल्या आहेत.
त्या अभ्यासण्यासाठी अभ्यासकांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. जे कायद्याच्या चौकटीत बसेल त्याबाबत सरकार नक्की निर्णय घेईल. उपलब्ध कायद्याच्या चौकटीत राहून आपण मराठा समाजाला लाखों कुणबी नोंदी देखील मिळवून दिल्या आहेत. पुढेही सहकार्य करत राहू. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील यांची आंदोलनाच्या सुरुवातीची मागणी तीच होती. त्यासंदर्भात काही दिवसांपूर्वी योगेश केदार यांनी अंतरवली येथे भेट घेऊन त्यासंदर्भातील चर्चाही केली होती. त्या नंतर काल मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन सदर निवेदन सादर केले.
महाराष्ट्रात जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आरक्षणाचा लढा सुरू आहे. आपण मुख्यमंत्री पदी आल्यावर शिंदे समिती नेमली त्यामाध्यमातून लाखों कुणबी नोंदी मिळू शकल्या, हेही आम्ही मान्य करतो. परंतु मराठवाड्यातील मराठा समाजाला त्याचा फार काही लाभ झाला नसल्याचे दिसून येत आहे. तुरळक ठिकाणी सोडल्यास कुणबी नोंदी सापडल्या नाहीत. त्यामुळे आजही तिथे आंदोलन सुरू आहे. जरांगे पाटील यांना वारंवार उपोषण करावे लागत आहे. शेकडो तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. याची माहिती आपल्याकडे नक्कीच असणार.
मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटीयर चा आधार घेऊन कुणबी नोंदी द्वारे आरक्षण भेटू शकते असे विद्वानांचे मत आहे. त्या मूळ मागणीला अनुसरून शासनाने सर्टिफाइड कॉपीज सुद्धा मिळवल्याचे ऐकण्यात येत आहे. त्याबाबत आपण मराठवाडा मुक्ती दिनापर्यांत निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरत आहे.