तुळजापूर (प्रतिनिधी)- संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून राज्यातील 25 लाख बंजारा समाजासाठी या योजनेची महाराष्ट्र शासनाने अंमलबजावणी केली आहे तांड्यातील आवश्यक मूलभूत सुविधासाठी 500 कोटी रुपयाची तरतूद केली आहे . राज्यातील बंजारा बांधवांनी तांडा समृद्धी योजनेचा लाभ घेऊन आपापल्या तांड्याचा सर्वांगीण विकास साधावा असे आवाहन बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथील बंजारा धर्मगुरू बाबुसिंग महाराज यांनी बोलताना केले.
तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी पाटील तांडा येथे बंजारा धर्मगुरु बाबूसिंग महाराज यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी बाबुसिंग महाराज आयोजित कार्यक्रमात बोलत होते . याप्रसंगी महाराष्ट्र शासनाच्या बंजारा तांडा समृद्धी योजनेचे धाराशिव जिल्हास्तरीय कमिटीचे सदस्य पदी निवड झाल्याबद्दल प्राचार्य संतोष चव्हाण यांचा पोहरादेवी येथील बंजारा धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आयोजित कार्यक्रमात सत्कारास उत्तर देताना प्राचार्य संतोष चव्हाण म्हणाले की , शासनाने माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी चोखपणे पार पाडून धाराशिव जिल्ह्यातील बंजारा तांड्यातील सार्वजनिक समस्यांचा निपटारा करून तांडा समृद्धी योजनेचा लाभ मिळवून देणार असे आश्वासित करून संधीचं सोन करून दाखवणा असल्याची ग्वाही दिली आहे. तर तांडा समृद्धी योजनेचे धाराशिव जिल्हा समन्वयक प्रविण पवार बोलताना म्हणाले की बंजारा समाजाचा मागच्या काळात म्हणावा तेवढा विकास झाला नाही त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने श्री संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना अमलात आणून बंजारा समाजाचा यापुढे भविष्यात स्मार्ट सिटी , स्मार्ट व्हिलेज च्या धरतीवर स्मार्ट तांडा करण्याचा संकल्प केलाय योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी तांड्यातील गट तट बाजूला ठेवून लोकसभागातून योजना राबवून आपापले तांडे स्मार्ट करावेत असे आवाहन प्रवीण पवार यांनी केले
प्रारंभी धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांच्या हस्ते येथील संत सेवालाल महाराज व आई जगदंबे देवीची मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी येथील बंजारा बांधव व महिलांनी बंजारा धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांचे दर्शन घेतले. याप्रसंगी तांड्याचे नायक संजय राठोड, कारभारी हारी पवार,गोर बंजारा प्रगती फाउंडेशनचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष राहुल चव्हाण ,बंजारा क्रांती दल युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष महेश चव्हाण, सुधीर राठोड , गुरुनाथ नुरा राठोड, राजू राठोड, राम राठोड, भालचंद्र राठोड, सोलापुर येथील तांडा समृद्धी योजनाअभियानाचे प्रवासी सदस्य युवराज राठोड, रामतीर्थ चे माजी सरपंच दामाजी राठोड, सरपंच लक्ष्मण राठोड, हंगरगाचे उपसरपंच मोहन चव्हाण, सुनील चव्हाण सह ग्रामस्थ महिला उपस्थित होते.