धाराशिव/भूम (प्रतिनिधी)-  पंढरपूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी उपोषणकर्त्याला पाठिंबा देण्यासाठी दि 23 सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्ह्यात भूम, परंडा, ईटकळ, उमरगा, शिराढोण, तेर येथे मोठ्या प्रमाणात रास्तारोको करण्यात आला.

भूम तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने भूम गोलाई चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तर परंडा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. उमरगा येथे बाळासाहेब ठाकरे चौकात रास्ता रोको करण्यात आला. तर शिराढोण येथे पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर रास्तारोको करण्यात आला. 

पंढरपूर येथे धनगर समाज एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचे बांधव आमरण उपोषणाला बसलेले आहेत. सदर अमरण उपोषण होऊन तेरा दिवस झाले तरी शासनाने अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे भूम तालुका धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको करून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. सकल धनगर समाजाच्या वतीने जर काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास पूर्णपणे शासन जबाबदार असेल असेल असा थेट इशारा देण्यात आला. सकल धनगर समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

 
Top