धाराशिव (प्रतिनिधी)- मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी व मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करण्यासाठी राज्य शासनास निर्देश देण्याची मागणी शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण यांच्याकडे केली आहे.
त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण व संबंधित मागण्यांची पुर्तता होण्यासाठी आंतरवाली सराठी येथे 17 सप्टेंबरपासून उपोषणाला बसलेले आहेत. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत आहे. सरकारने मराठा समाजाच्या भावनांचा अंत न पाहता जरांगे पाटील यांना जी आश्वासने दिली आहेत, त्यांची पुर्तता करणे आवश्यक आहे. जरांगे पाटील यांच्या खालावत चाललेल्या प्रकृतीची दखल घेवून उपोषण तातडीने सोडवण्यासाठी दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करावी.