तुळजापूर (प्रतिनिधी) - समाजवादी पार्टी जिल्हाअध्यक्ष पदी आमीर ईब्राहीम शेख यांची निवड करण्यात आली.
रविवार दि23रोजी समाजवादी पार्टी मुंबई येथील कार्यालयात अमीर शेख आपसिंगा यांना समाजवादी पार्टीच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आले व नियुक्ती पञ देण्यात आले. समाजवादी पार्टीचे मुंबई महाराष्ट्र प्रदेशाघ्यक्ष तथा आमदार अबु आसिम आझमी यांच्या आदेशानुसार समाजवादी पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रतापराव होगाडे, जनरल सेक्रेटरी परवेझ सिद्धीकी डॉ.अब्दुल रौफ शेख,.प्रदेश कार्यकारणी अँड.रेवन भोसले उपस्थिती होते. समाजवादी पार्टी जिल्हाअध्यक्ष पदी अमीर शेख यांच्या निवडीचे वृत्त कळताच फटाके फोडुन आनंदोत्सव साजरा केला.