धाराशिव (प्रतिनिधी)- जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून उस्मानाबाद जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आणि धाराशिव शहरातील सर्व फार्मसी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत फार्मासिस्ट रॅली, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्र, तसेच वृक्षारोपण यासारखे उपक्रम उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात सांस्कृतिक भवन येथे एका छोट्या कार्यक्रमाने झाली, जिथे धाराशिव शहरातील ज्येष्ठ केमिस्ट श्री. विजय राजूरकर आणि श्री. विनोद पवार यांचा औषधी क्षेत्रातील 35 वर्षांच्या सेवेबद्दल सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त श्रीकांत पाटील, चे फार्मसी इन्स्पेक्टर प्रदीप व्हटकर, आणि जिल्हा संघटनेचे अध्यक्ष धनाजी आनंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहरातील फार्मसी महाविद्यालयांचे प्राचार्य व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यात शहरातील औषधी निर्माण शास्त्र महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात यशस्वी विद्यार्थ्यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यानंतर तेरणा कॉलेज ऑफ फार्मसी येथे मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये फार्मसी इन्स्पेक्टर प्रदीप व्हटकर, जिल्हाध्यक्ष धनाजी आनंदे, कोषाध्यक्ष कुणाल गांधी, तालुकाध्यक्ष रोहित फिसरेकर, मारुती कृपाळ, आणि शहराध्यक्ष विशाल हिंगमीरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.. या सत्रानंतर महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.