कळंब (प्रतिनिधी) - सध्याच्या मुल शैक्षणिक स्पर्धात्मक युगामळे मैदानावरील स्पर्धा हरवुन बसले आहेत. आई वडीलांचा मोठ्या पदावर पोहचविण्यासाठीचा अट्टाहास मुलांच्या मानसिकतेवर परीणाम करणारा आहे. त्यामुळे आई वडीलांसह शाळेनी सुध्दा मुलांना क्रीडांगणावर नेले पाहिजे. जेणेकरून मुलांचा सर्वांगीण विकास होईल व मुले ताजेतवाने रहातील असे उदगार शहरातील प्रसिद्ध दंतचिकित्सिका डॉ. संजीवनी जाधवर यांनी शहरातील मॉडेल इंग्लिश स्कूल आयोजित आरोग्य शिबिरात काढले.

यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ रामकृष्ण लोंढे, डॉ प्रियंका जाधवर, प्राचार्या लता यंदे उपस्थित होते. पुढे बोलताना जाधवर म्हणाल्या की, सध्या सर्वच कुटुंब धावपळीत आहेत. परंतु आपल्या कुटुंबाचेच नव्हे तर देशाची भविष्य असणार्या मुलांची माणसिक स्थिती समजून घेउन मुलांना वेळ देणे आवश्यक आहे. चुकीचे अन्नपदार्थ देऊन आपण आपल्या मुलांवरच अन्याय करत आहोत याची जाणीव पालकांना होणे आवश्यक आहे. मुलांना मोबाईल च्या बाहेर काढणे सध्या अतिशय आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. फास्ट फूड, चॉकलेट्स, बाजारात उपलब्ध असणारी विविध पेये याबाबत पालकांनी व शिक्षकांनी जागरूक रहाण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना यावेळी वैयक्तिक मार्गदर्शन उपलब्ध डॉ नी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या लता यंदे यांनी केले तर सुत्रसंचालन व आभार माधव कुलकर्णी यांनी केले.


 
Top