परंडा (प्रतिनिधी) - धनगर समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण मिळावे या मागणीसाठी पंढरपूर येथे सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सोमवार दि.23 रोजी परंडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

यावेळी धनगर समाज कार्यकर्त्यांनी वाहतूक रोखून धरली.असता काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती त्यानंतर आंदोलकांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले.धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी पंढरपूर येथे गेल्या दोन आठवड्यांपासून उपोषण सुरू आहे.या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोको करण्यात आला. यावेळी धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top