तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर विधानसभा मतदार संघातील सर्वच इच्छुक उमेदवार हे आरक्षण संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची अंतरवली सराटी, जि. जालना येथे जाऊन सदिच्छा भेट घेऊन येत आहे.
लोकसभा निवडणुकीत तुळजापूर विधानसभा मतदार संघात मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनचा मतध्दारे प्रभाव दिसल्याने हे मतदार आपल्या बाजुने राहावेत. यासाठी आजपर्यत विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजीमंञी मधुकर चव्हाण यांनी तुळजापूर येथे तसेच संभाजी ब्रिगेडचे शरद पवार, देवराज मिञमंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी, स्वराज्य संघटना जिल्हाअध्यक्ष महेश गवळी यांनी भेट दिली. तर नुकतेच तुळजापूर विधानसभा मतदार संघातुन लढण्यास इछुक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक जगदाळे यांनी मराठा आरक्षण संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची अंतरवली सराटी, जि. जालना येथे जाऊन सदिच्छा भेट घेऊन श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा व कवड्याची माळ भेट देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक जगदाळे, अमर चोपदार, नितीन कासार, अमृत पुदाले, दीपक काशीद, रमेश जाधव, ताजुद्दीन शेख, नानासाहेब पाटील, राजकुमार पाटील, शिवाजी सावंत, राजकुमार बोबडे, सतीश माळी, सिकंदर भेगडे, शहाजी सोमवंशी, आकाश मुंगळे, पांडुरंग माने, ज्योतिबा जाधव, संजय जाधव, दिनकर जगताप, विक्रम जाधव, अरुण काळे, धनराज पाटील, रामकृष्ण पाटील, प्रशांत कुदळे, शिवाजी मते, दाजी पाटील, बाळासाहेब मते, अभिजीत पाटील, गडाजी येळणे आदी उपस्थितीत होते.