तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर विधानसभा मतदार संघातुन महाविकास आघाडी वतीने लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तर्फा राष्ट्रवादीकाँग्रेस युवती प्रदैशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी उमेदवारीमागणी अर्ज शुक्रवार दि. ६ रोजी मुंबई येथे पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी रवी वर्पे ,सामाजिक न्याय विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी आमदार जयदेव गायकवाड ,राष्ट्रीय सरचिटणीस नसीम सिद्दिकी ,प्रवक्ते विकास लवांडे ,माझे धीरज ,आदित्य, सुमित, नगरसेविका सुनिताताई ,सुनील अदिसह तालुक्यातील पदाधिकारी उपस्थितीत होते.
राष्ट्रवादीकाँग्रेस युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर या दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडुन आल्या असुन त्या राष्ट्रवादीकाँग्रेस मध्ये खा सुप्रियाताई सुळे यांच्या जवळच्या मानल्या जातात