तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठवाडा मुक्ती संग्रामातील प्रमुख असणाऱ्या आपसिंगा गावातील साविञींच्या लेकी मुलींन साठी शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या सरकार माञ त्यांच्या पुढील उच्च शिक्षणासाठी गावाकडुन एसटीच नसल्याने विद्यार्थी, विद्यार्थिनींना शिक्षण घेण्यासाठी जीव धोक्यात खाजगी वाहनातुन शिक्षणासाठी प्रवास करावा लागत आहे. तर काही मुलींना शिक्षणावर पाणी पडले आहे.
लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला असंख्य बसेस वापरल्या.पण शालेय मुला मुलींसाठी एकही बस नसेल तर केवढी मोठी शोकांतिका म्हणावी. तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा हे साडेसात हजार लोकसंख्येचे गाव. अपसिंगा - तुळजापूर आणि अपसिंगा- धाराशिव दरम्यान अवैद्य वाहतुकीने कळस गाठला आहे. एकेकाळी दिवसभरातून 28 बस फेऱ्या असलेल्या या गावाला गेल्या कित्येक वर्षापासून एकही बस नाही. वजनदार आणि सक्षम पुढाऱ्यांचा अभाव असल्याने गाव कित्येक समस्यांना सामोरे जात आहे. गावच्या मार्गावर एकही बस नसल्याने अनेक गोरगरीब मुलींना शिक्षण थांबवावे लागले आहे. शहराच्या ठिकाणी खोली करून शिक्षण घेणे अडचणीचे व न परवडणारे असल्यामुळे अनेक गोरगरीब पालकांनी मुलींचे शिक्षण बंद केलेय. परंतू याचे सोयरसुतक कोणालाच नाही.
एकीकडे मुलींना शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या सरकारला ही चपराकच म्हणावी लागेल. आणि विद्यार्थिनी, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी या मार्गावर बस सेवा मिळत नसेल तर सरकारच्या सवलती नक्कीच कुचकामी म्हणावे लागेल. विद्यमान खासदार, आमदार यांच्यासाठी ही बाब सत्वपरीक्षा घेणारी ठरेल यात शंका नाही.