तुळजापूर (प्रतिनिधी)-  तुळजापूर पत्रकार संघ आयोजित गौरी गणपती आरास स्पर्धा 2024 बक्षीस वितरण सोहळा रविवार 29 सप्टेंबर रोजी पुजारी मंडळ मंगल कार्यालय येथे सायंकाळी 5 वाजता केले जाणार आहे. 

यंदा प्रथमच पत्रकार संघ आयोजित गौरी गणपती आरास स्पर्धेत तुळजापूर शहरातील 50 हुन अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. शहरातील महिलांनी गौरी गणपतीची विविध सामाजिक आणि धार्मिक संदेश देणारी आरास करत आपल्या हस्तकलेच्या माध्यमातून स्थिर असो वा हलते देखावे तयार केले होते.

तुळजापूर शहरातील पत्रकार संघाच्या वतीने महिलांनी केलेल्या कौटुंबिक धार्मिक सेवाकार्याची दखल घेत एक नाविन्यपूर्ण स्पर्धेचे आयोजन केले होते.कमी कालावधीत घोषित करण्यात आलेल्या या स्पर्धेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत सहभागी सर्व महिलांना पत्रकार संघांतर्फे  गौरी गणपती आरास स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रथम बक्षिस रोख दहा हजार,सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र द्वितीय बक्षीस सात हजार, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र तृतीय बक्षीस पाच हजार सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र दिले जाणार आहे. दहा स्पर्धकांचा उत्तेजनार्थ सन्मान केला जाणार आहे. तर सर्व सहभागी प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

 
Top