तुळजापूर (प्रतिनिधी) - तिर्थक्षेञ तुळजापूर शहराची गेली अनेक वर्षापासून तृष्णा भागविणा-या पाचुंदा साठवण तलाव ची प्रचंड दुरावस्था झाली आहे. हा तलाव फुटण्याची शक्यता त्या भागातील शेतकरी वर्गातुन व्यक्त केली जात आहे. सदरील तलाव दुरुस्ती झालेला खर्च कुणाचा घशात गेला याची चौकशी करण्याची मागणी होत आहे

तिर्थक्षेञ तुळजापुर शहराच्या अतिरिक्त जल पुरवठ्यासाठी निर्माण केले गेलेले पाचूंदा साठवण तलाव आज पाठबंधारे कार्यालय,विभाग तुळजापुरच्या दुर्लक्षामुळे हजारो लिटर पाणी गळती मुळे वाया जावुन तो कुमकुवत बनत चालला आहे. हा तलाव,भरला कि वर्षभर तिर्थक्षेञ तुळजापूर पाणीपुरवठा  होवु शकतो. यात विजेची बचत होवुन कमी खर्चात पाणी उपलब्ध  होते. परंतु गळतीमुळे जानेवारीतच येथील पाणीसाठा संपुष्टात येत आहे.

मागील  गेल्या संपूर्ण उन्हाळ्यात पाण्याच्या टंचाई मुळे आपण आपल्या जीवनात पाण्याची आवश्यकता काय असते हे पहिले आहे .परंतु या वर्षाच्या पावसाळा मध्ये आई श्री तुळजाभवानीच्या आशीर्वादाने आज तुळजापुर जवळचे सर्व जल साठे हे 100% भरण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे येणाऱ्या संपूर्ण वर्षामध्ये पाण्याची टंचाई तुळजापुर शहरास भासणार नाही.

परंतू देवतांच्या कृपेने येवढा पाऊस पडून ही आपण त्या पाण्याचे योग्य साठवण आणि नियोजन करू शकलो नाही. तर येवढा पाऊस पडून ही त्याचा काहीही उपयोग होणार नाही. तसेच पाचुंदा साठवण तालव हा आज 100% भरण्याच्या मार्गावर आहे. तरीही त्याची पूर्ण दुरूस्ती अद्याप ही केली गेलेली नाहीये. पाचुंदा साठवण तलावच्या बंधारामध्ये खूप प्रमाणात वृक्ष आले आहेत. त्यामुळे तलावातून पाण्याचा विसर्ग होत आहे. आसाच विसर्ग होत राहिला तर साठवण या शब्दाचा काहीही अर्थ नाही राहणार. जर हे तलाव फुटले तर जवळ पासच्या शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. तसेच नवीन राष्ट्रीय महा मार्गाचे ही नुकसान होईल. तरी  होणारे संभाव्य धोका टाळण्यासाठी याची तातडीने दुरुस्ती काम करावेत. आजपर्यंत झालेल्या दुरुस्ती कामाची सखोल चौकशी करुन संबंधित दोषी वर कारवाई करण्याची मागणी  होत आहे.

 
Top