तुळजापूर (प्रतिनिधी) - तिर्थक्षेञ तुळजापूर येथील मंगळवारी भरणारा आठवडा बाजार सध्या वादग्रस्त विषय बनत चालला आहे.
बुधवारी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी स्थानिकांशी चर्चा केली असता आहे. त्या ठिकाणी समोरील वट्टे सोडुन तात्पुरता मागे बाजार भरावा नंतर या बाबतीत काय होतेय ते पाहुन योग्य तो निर्णय घ्या असे स्पष्ट करुन आठवडा बाजार भरवणे निर्णय मुख्याधिकारीकडे सोपवला. तिर्थक्षेञ तुळजापूरचा बाजार मंगळवारी भरतो देविचा वार मंगळवार असल्याने येणारे भाविक पन्नास हजार, ग्रामीण भागातुन आलेले पंधरा हजार अशी एकच गर्दी बाजार रोड, बसस्थानकासह अनेक भागात होत असल्याने हा बाजार बुधवारी भरण्याची मागणी शुक्रवार पेठ भागातील नागरिकांनी केली. बाजारात येणाऱ्या पन्नास व्यापाऱ्यांनी बुधवार ऐवजी गुरुवार, शनिवार भरवावा अशी मागणी केली. तर स्थानिक दुसऱ्या गटाने मंगळवारीच बाजार भरवावा अशी मागणी केली. हे कमी कि काय म्हणून खासदार ओमराजे निंबाळकर यांनी यात उडी घेवुन जिल्हाधिकारी यांना तुळजापुर येथील आठवडी बाजार पुर्वीप्रमाणे मंगळवारी सुरु ठेवणे मागणी केली. याला कारण देताना ते म्हणाले कि, मंगळवार भावीक भक्त तुळजापुर येथे दर्शनासाठी येतात. यामुळे शेतकरी व व्यापारी यांना या गोष्टीचा व्यावसायीक लाभ होत होता. शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीवरती व सर्व व्यापारांच्या व्यावसायावरती परीणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुर्वीप्रमाणे तुळजापुर येथील आठवडी बाजार मंगळवारी सुरु ठेवणेबाबत शेतकरी व व्यापाऱ्यांकडून मागणी करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आपल्या स्तरावरुन योग्य ती कार्यवाही करावी.असे म्हटले आहे.