उमरगा (प्रतिनिधी)- आज दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी धाराशिव जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा युवा नेते अश्लेष शिवाजीराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्यावर महाराष्ट्राचे लाडके आराध्यदैवत श्री छतपत्री शिवाजी महाराज यांचा भ्रष्ट महायुतीच्या सरकारच्या भोंगळ कारभारामुळे पुतळा कोसळला याचा जाहीर निषेध करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी उमरगा येथे स्व.बाळासाहेब ठाकरे चौक येथे रास्ता रोको करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, ऍड. दिलीप सगरसाहेब, ऍड.अशोक पोतदार, काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष माजी नगरसेवक विजय दळगडे, माजी नगरसेवक एम. ओ. पाटील, माजी नगरसेवक विजय वाघमारे, नाणाराव भोसले, लोहारा काँग्रेस सेवादल तालुका अध्यक्ष राजू तोरकडे, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष ऍड  एस पी इनामदार, उमरगा काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष राहुल वाघ, उपाध्यक्ष सतीश मुदकंना, शहर कार्याध्यक्ष अभिषेक औरादे,तालुका काँग्रेसचे सतीश जाधव, शिवाजी गायकवाड, बाबा मस्के, दादासाहेब गायकवाड, ऍड इरफान जमादार, सोहेल इनामदार, प्रफुल्ल गायकवाड, अविनाश माळी, प्रकाश चव्हाण, विराज मोरे, बालाजी  मोरे, गणेश पाटील, नितीन कोराळे, अनिल साळुंखे, विशाल काणेकर, प्रा .अजय कांबळे,अरविंद पाटील, संतोष चौधरी, जीवन सरपे, व्यंकट पवार, अशोक ममाळे, नितीन राठोड, अभिमन्यू कांबळे, अभंग शिंदे ,गणेश वाघमोडे, संगमेश मंटाळकर,गणेश सूर्यवंशी,गणेश केशवशेट्टी, प्रा. माने, महेश जाधव, सचिन बेंबळगे, कृष्णा पाटील यांच्या सह काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या प्रमाणत उपस्थित होते.

 
Top