तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील मौजे इटकळ येथील दिनेश सलगरे व त्यांच्या पत्नी  मधूराताई सलगरे यांनी श्री संत एकनाथ महाराज लिखित भावार्थ रामायण ग्रंथ वाचन निरुपण सेवेतून करतात समाज प्रबोधन. 

आजची तरुण पिढी ही मोबाइल सोशल मीडियाच्या विळख्यात जखडली गेल्याने त्यांना धार्मिकतेचा लवलेश ही नसल्याचे दिसून येते. खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जीवन कसं जगावं हे ज्ञान फक्त फक्त पोथी पुराणातुनच मिळत. पूर्वी प्रत्येक गावात मंदिरावर घरोघरी अनेक देव देवतांचे ग्रंथ वाचन निरुपण केले जायचे. त्यामूळे आपण माणूस म्हणून जन्माला आलोय आपण नेमक या क्षणभंगुर जीवनात काय आचरण केले पाहिजे हे या ग्रंथातून आत्मसाद व्हायचे. त्यामूळे पूर्वीचे माणसं ही प्रेमळ मायाळू व विश्वासू होते. पण कालांतराने या फेसबुक, व्हॉट्स ॲप मोबाइलच्या युगात पोथी पुराण वाचन निरुपण दुरापास्त झाले. त्यामूळे या मोबाइल युगात तरूण पिढी मोबाइलच्या विळख्यात अडकली व माणूस म्हणून कसं जगावं या ज्ञानार्जनापासुन वंचित झाली. त्याचा परिणाम म्हणून व्यसन करणे, थोरमोठ्याचा अनादर करणे, आई वडिलांना कमी लेखणे, देवाचं अस्तित्व न मानणे, यामुळे खऱ्या सुखापासून तरुणाई दूर गेली. तरुणांमध्ये नव चैतन्य यावे. भगवान प्रभु रामचंद्र यांनी अधर्माने आचरण करणाऱ्या राक्षसांचा निपांत करून धर्माची घडी बसवली व रामराज्य निर्माण केले. त्याच प्रभु रामचंद्र यांच्या नाम स्मरणाची गोडी तरूण पिढीला लागावी हा उद्देश ठेवत पत्रकार दिनेश सलगरे व त्यांच्या पत्नी सौ मधुराताई सलगरे यांनी भावार्थ रामायण ग्रंथ वाचन निरुपण सेवेतून तरुणामध्ये प्रबोधन करण्याचे कार्य ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात करीत आहेत. आज रामभक्त दिनेश सलगरे यांच्या प्रयत्नातून इटकळ व परिसरातील बाभळगाव, खानापुर, केरूर, धनगरवाडी, उमरगा चि., हिप्परगा ताड, येवती, वत्सलानगर (अणदूर), पितापुर, चव्हाणवाडी आदी गावात श्री रामविजय ग्रंथ, श्री हरिविजय ग्रंथ, श्री भक्तिविजय ग्रंथ व श्री संत एकनाथ महाराज लिखित भावार्थ रामायण ग्रंथ मोठया उत्साहात व भक्तिमय वातावरणात सुरू आहेत. भविष्यात तुळजापुर तालुक्यांतील प्रत्येक गावात मंदिरावर ग्रंथ वाचन करण्यासाठी त्या त्या गावातील राम भक्तानां प्रोत्साहित करणार असल्याचे ही प्रतिनिधीशी बोलताना सांगीतले. रामभक्त दिनेश सलगरे व त्यांच्या पत्नी सौ. मधुराताई सलगरे यांनी राबवत असलेल्या या धार्मिक उपक्रमाचे कौतुक गाव परिसरातील रामभक्तातून केले जात आहे.

 
Top