तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील शुक्रवार पेठ भागातील सतत खंडीत वीज पुरवठ्या होत असल्याने या भागातील रहिवाशांनी मंगळवार दि. 3 सप्टेंबर रोजी महावितरण कार्यालयात जावुन अधिकाऱ्यांना निवेदन देवुन वीजपुरवठा सुरुळीत करण्याची मागणी केली. यावेळी येत्या आठ दिवसात सर्व कामे पुर्ण करुन विद्युत पुरवठा सुरुळीत करण्याचे आश्वासन दिले.
शुक्रवारपेठ भाग हा श्रीतुळजाभवानी मंदीर लगत असुन मागील एक वर्षापासून या भागात विजेचा खेळखंडोबा होत आहे. दरम्यान नागरिकांनी वेळेत काम पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला. महावितरण अधिकाऱ्यांनी आठ दिवसाच्या आत सर्व कामे पूर्ण करून विद्युत वीजपुरवठा सुरळीत सुरू करू असे आश्वासन दिले. यावेळी नवले, क्षीरसागर, विजय भोसले, संजय रोचकरी, किरण अमृतराव, नीरज साळुंखे, दिवाकर शेळके, सतिश भोसले, गोविंद खुरुद, विशाल रोचकरी, बंडू शेळके, श्रीकांत झाडपिदे, शशी नवले उपस्थित होते.