तुळजापूर (प्रतिनिधी)-  शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे तत्वज्ञान आणि शिकवण जीवनाला आकार देणारे आहे असे प्रतिपादन अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूरचे माजी कुलगुरू व हिंदी विषयाचे गाढे अभ्यासक डॉ. इरेश स्वामी यांनी केले. येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे 1971 ते 1978 या कालावधीत तुळजाभवानी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह सम्मेलन नुकतेच संपन्न झाले. या प्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की,मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेले तुळजापूर हे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई जगदंबेच्या वास्तव्याने पवित्र आहे. या मातीत शिक्षणाचे बिजे रोवली ती शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी, आमची पीढी ही बापूजींच्या सहवासामुळे शैक्षणिक दृष्ट्या अधिक प्रगल्भ झाली. तो काळ बापूजींच्या विचारांमुळे भारावून गेलेला होता. 1971 साली जे विद्यार्थी तुळजाभवानी महाविद्यालयात उच्च शिक्षण घेण्यासाठी आले त्यांनी बापूजींचे तत्वज्ञान प्रत्यक्ष याची देहा याची डोळा अनुभवले. जगामध्ये असा अनुभव कुठेही प्राप्त होणार नाही. 

यावेळी अंकुश माने, डॉ.चिकमठ, प्राचार्य हिरेमठ, डॉ.फारुक सिद्दिकी, ए.व्ही जगदाळे, व्ही. त्रही. जगदाळे, डॉ. यशवंतराव डोके ,प्रा.सुधीर शिंदे, प्राचार्य धुमरे  प्रा.ए.डी.जाधव आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद कवठेकर यांनी केले. तर अध्यक्षीय समापन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. जीवन पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी तोडकरी, महाजन सर, हंगरगेकर, धनंजय लोंढे, प्रा. डॉ. काळे, डॉ. कस्तूरे यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन प्रसन्ना कोंडो, सुनिता बापट परांजपे यांनी केले. तर आभार पी.पी. कुलकर्णी यांनी केले. सदर कार्यक्रमास सर्व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top