भूम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर कुस्ती स्पर्धेमध्ये 14 वर्षे वयोगटातून जमादार टिपू बुबुकर जिल्ह्यात प्रथम व 17 वर्ष वयोगटातून जगताप शिवराज जिल्ह्यात प्रथम या दोघांचीही नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

 तसेच 17 वर्षे वयोगटातून श्री गुरुदेव दत्त शाळेचा माजी विद्यार्थी जमादार असलम बुबुकर जिल्ह्यात प्रथम व विभागीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. तसेच जिल्हा असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम व  राज्यस्तरावर निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव मोटे व संस्थेचे सचिव व पर्यवेक्षक सतीशराव देशमुख, मुख्याध्यापक दत्ता भालेराव, क्रीडाशिक्षकजयंत शिंदे व  आप्पा मिसाळ यांनी विजयी खेळाडूंचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

 
Top