धाराशिव (प्रतिनिधी)- मूकबधिर असोसिएशन धाराशिव ता. जि. धाराशिव यांच्यावतीने आज सांकेतिक भाषेचा आंतरराष्ट्रीय दिवस व जागतिक कर्णबधिर दिनाचे औचित्य साधून शहरात रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेत सर्व मूकबधिर व कर्णबधिर बांधवांना शुभेच्छा देऊन जागतिक कर्णबधिर दिन साजरा केला. यावेळी बोलताना नितीन काळे म्हणाले की धाराशिव मूकबधिर असोसिएशनचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. समाजातील मूकबधिर व कर्णबधिर बांधवांच्या विकास व उन्नतीसाठी महायुती सरकारने विविध प्रकारच्या अनेक सुविधा व योजना राबवल्या आहेत. समाजातील कोणताही घटक सरकारच्या योजना पासून वंचित राहणार नाही, यासाठी भारतीय जनता पार्टी, धाराशिव सतत प्रयत्नशील असून सर्वांनी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.