तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांची 97 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे कनिष्ठ विभागप्रमुख प्रा धनंजय लोंढे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन अभिवादन करण्यात आले. सदर प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. जीवन पवार यांनी वरील प्रतिपादन केले. 

पुढे ते म्हणाले की, शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांनी महाराष्ट्राच्या बहुजन समाजातील तरुणांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. पण आईचा त्यागही विसरता येणार नाही. समाजातील उपेक्षित तरुणांना स्वतःच्या आईप्रमाणे सांभाळून मायेची उब दिली. आईचा त्याग हा लेकरांसाठी असतो.स्वत: कष्ट करुन, स्वतः उपाशी राहून लेकरांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांनी आपले आयुष्य पणाला लावले. त्यांचा हा  त्याग महाराष्ट्र विसरणार नाही.असे अनमोल मार्गदर्शन डॉ.पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.मंत्री आर.आडे यांनी केले. सदर प्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा.राजा जगताप यांनी मानले.

 
Top